Rashmi Mane
काल पार पडलेली महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणुकीची लढत खूपच रोचक झाली.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात.
मिलिंद नार्वेकर यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली ती मुळात मुंबईत शिवसैनिक म्हणून.
मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरातून शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून ते काम करायचे.
तब्बल 25 वर्षांनंतर 2018 मध्ये मिलिंद नार्वेकर यांना शिवसेनेत पहिल्यांना संघटनात्मक पद देण्यात आलं.
2022 मध्ये एकनाथ शिंदे वेगळे झाले तेव्हा देखील नार्वेकरांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडली नाही.
एक साधा शिवसैनिक ते उद्धव ठाकरे यांचे पीए आणि आता आमदार, असा नार्वेकर यांचा प्रवास रंजक आहे.