Chetan Zadpe
भाजपच्या दिल्लीतील दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची आज सांगता झाली.
यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्याच्या प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला.
अशी अभ्यासपूर्ण बैठक आणि मार्गदर्शनासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचे खूप खूप आभार, अशी भावना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली.
अशा खंबीर नेतृत्वात आणि केंद्राच्या भक्कम पाठिंब्यामुळे राज्य सरकारमध्ये आम्ही उत्तम कामगिरी करुन नागरिकांना सेवा देऊ शकतो, असेही फडणवीस म्हणाले.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या संवादानंतर वरिष्ठ नेत्यांचे फोटोसेशन करण्यात आले. यावेळी फडणवीस मोदींच्या पाठिमागे उभे असलेले दिसले.