भाजपची ‘राजकीय शाळा’ मोदींसाठी ठरली खास; ना थाटमाट ना भाषण फक्त...

Rajanand More

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारचा (ता. 7) दिवस खास होता. संपूर्ण दिवस त्यांनी पक्षातील अन्य खासदारांसोबत घालवला. ना थाटमाट होता ना भाषण. फक्त त्यांनी इतर नेत्यांचे अनुभव ऐकले.

Narendra Modi | Sarkarnama

कार्यशाळा

निमित्त होते दिल्लीत आयोजित भाजपच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे. खासदारांसाठी या कार्यशाळेत मोदींनी दिवसभर सहभाग घेतला. सर्व खासदारांसोबत बसून मार्गदर्शन ऐकून घेतले.

BJP workshop | Sarkarnama

शेवटच्या रांगेत

पंतप्रधान मोदी या कार्यशाळेत शेवटच्या रांगेत बसले होते. त्यामुळे अनेक खासदारांना त्यांचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. हे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

साधेपणा

पंतप्रधान मोदींचा हा साधेपणा खासदारांना भावला. ते सकाळी 10.45 वाजता कार्यशाळेत पोहचले. पण व्यासपीठाकडे न जाता ते शांतपणे मागील रांगेत रिकाम्या असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले.

PM Narendra Modi | Sarkarnama

राजकीय शाळा

भाजपची ही कार्यशाळा म्हणजे खासदारांसाठी राजकीय शाळाच असते जनतेपर्यंत कसे पोहचावे, सोशल मीडियाचा वापर, विरोधकांना कसे उत्तर द्यायचे, सरकारची धोरणे, योजना आदी बाबींची माहिती दिली जाते.

PM Narendra Modi | Sarkarnama

कुणाचा सहभाग?

कार्यशाळेत लोकसभा व राज्यसभेचे सर्व खासदार, केंद्रीय मंत्री, पक्षाध्यक्ष, संघटनेतील पदाधिकारी, काहीवेळा विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांचाही सहभाग असतो.

PM Narendra Modi | Sarkarnama

पक्षात महत्व

कार्यशाळेत पक्षात महत्वाचे मानले जाते. देशभरातील खासदार यामध्ये आपले अनुभव सांगत असतात. पक्षवाढ तसेच संघटनात्मक कौशल्य आदी दाखविण्याची संधी याठिकाणी खासदारांना मिळत असते.

PM Narendra Modi | Sarkarnama

काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधानांनी सोशल मीडियात फोटो शेअर केले आहे. एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि लोकांची सेवा आपण आणखी चांगल्याप्रकारे कशी करू शकतो, हे सांगण्यासाठी ही कार्यशाळा महत्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.     

PM Narendra Modi | Sarkarnama

NEXT : वडील-आजोबांचा विक्रम मोडला; कोण आहेत 4 हजार कोटींच्या पॅलेसमध्ये राहणारे युवराज?

येथे क्लिक करा.