वडील-आजोबांचा विक्रम मोडला; कोण आहेत 4 हजार कोटींच्या पॅलेसमध्ये राहणारे युवराज?

Rajanand More

महाआर्यमन शिंदे

महाआर्यमन शिंदे हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर राजघराण्याचे वारस आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे त्यांचे वडील असून माधवराव शिंदे हे आजोबा आहेत.

Mahanaaryaman Scindia | Sarkarnama

पहिली निवडणूक

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनची निवडणूक त्यांनी लढवली आणि बिनविरोध जिंकली आहे. ते आता या असोसिएशनचे अध्यक्ष बनले आहेत. ही त्यांची पहिलीच निवडणूक होती.

Mahanaaryaman Scindia | Sarkarnama

विक्रम मोडला

असोसिएशनचे सर्वात तरूण अध्यक्ष म्हणून महाआर्यमन यांनी विक्रम केला आहे. त्यांनी वडील आणि आजोबांचा विक्रम मोडला आहे. ज्योतिरादित्य हे 35 व्या वर्षी तर माधवराव शिंदे हे वयाच्या 37 व्या वर्षी अध्यक्ष बनले होते.

Mahanaaryaman Scindia | Sarkarnama

परदेशात शिक्षण

महाआर्यमन यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1995 रोजी झाला आहे. शालेय शिक्षण डेहराडूनमध्ये पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले. येल विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे.

Mahanaaryaman Scindia | Sarkarnama

क्रिकेटची आवड

महाआर्यमन हे सध्या मध्य प्रदेश क्रिकेट लीगचे अध्यक्ष आहेत. विजेत्या संघाला सिंधिया कप दिला जातो. ग्वाल्हेर डिव्हीजन क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षही असून यामाध्यमातून त्यांनी क्रिकेटची आवड असलेल्या युवा वर्गाला संधी दिली आहे.  

Mahanaaryaman Scindia | Sarkarnama

युवराज

महाआर्यमन यांना ग्वाल्हेरचे युवराज म्हणून ओळखले जाते. परदेशात शिक्षण घेतले असले तरी ते राजघराण्याशी संबधित सर्व परंपरांचे आदराने पालन करतात.

Mahanaaryaman Scindia | Sarkarnama

4 हजार कोटींचा पॅलेस

ग्वाल्हेरमधील तब्बल 4 हजार कोटींच्या जयविलास पॅलेसमध्ये ते राहतात. हा पॅलेस शिंदे राजघराण्याचा महल आहे. या पॅलेसमध्ये सुमारे 400 खोट्या आहेत. तब्बल 15 एकर परिसरात हा महल आहे.

Mahanaaryaman Scindia | Sarkarnama

राजकीय पाऊल

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनमधील त्यांच्या एन्ट्रीकडे राज्याच्या राजकारणातील पहिले पाऊल मानले जात आहे. असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी मागील दाराने राजकारणात प्रवेश केल्याची चर्चा आहे.

Mahanaaryaman Scindia | Sarkarnama

NEXT : वडिलांनी पक्षातून हकालपट्टी करताच लेकीचा आमदारकीचाही राजीनामा

येथे क्लिक करा.