Roshan More
जे पी नड्डा केंद्रीय मंत्री झाल्यापासून भाजपचे अध्यक्षपद रिक्त आहे. लवकरच नवीन अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे.
भाजप अध्यक्षपदासाठी चार केंद्रीय मंत्री स्पर्धेत आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये घेतले जात आहे. त्यांच्या नावाबाबत संघ देखील सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांचे देखील नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. संयमी आणि जनधारा असलेला नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जात आहे.
भाजप अंतर्गत पहिल्या महिला अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण यांचे नाव आघाडीवर आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नावाला अध्यक्षपदासाठी सर्वाधिक पसंती असल्याचे म्हटले जात आहे. खट्टर हे पंतप्रधान मोदी यांचे लाडके अन् निकटवर्तीय मानले जात आहेत.
केंद्रीय मंत्र्यांसह आंध्र प्रदेशच्या भाजच्या माजी अध्यक्षा डी पुरंदरेश्वरी तसेच वनाथी श्रीनिवासन यांचे नाव देखील अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.