Roshan More
सहा वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलनानंतर भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाने पुन्हा भाजपसोबत युती केली आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आज पत्रकार परिषद घेत जाहीर करण्यात आला.
अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन नबीन हे देखील उपस्थित होते.
शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्या 1997, 2002, 2007, 2012 और 2017 या पाच विधानसभा निवडणुका एकत्र युतीत लढल्या होत्या.
या युतीला 1997, 2007 और 2012 च्या निवडणुकीत सत्ता मिळावली होती.
या युतीचा फटका आम आदमी पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व्हेमध्ये भाजप आणि अकाली दलाच्या मतांची एकत्र टक्केवारी 30 टक्क्यांच्या पुढे जात आहे.
भाजप-अकाली दलाच्या युतीने पंजाबमध्ये विधानसभेची तिरंगी लढत होणार आहेत. या युतीविरोधात आप, काँग्रेस हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.