Deepak Kulkarni
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर त्यांनी 9 मे 2026 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
आता 23 नोव्हेंबर 2026 रोजी त्यांनी 'पश्चिम बंगाल'चे इंग्रजी नाव 'पश्चिम बंगा' (Paschim Banga) करण्याबाबत विधानसभेत प्रस्ताव मांडणार असल्याची घोषणा केली आहे.
अधिकारी यांनी बंगालचे मुख्यमंत्री झाल्यापासून ममता बॅनर्जी यांच्या सरकारचे अनेक जुने नियम बदलले आहेत.
आता ते पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या नामांतरासाठी आग्रही भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे.
पश्चिम बंगालच्या नव्या नावाचा प्रस्ताव अधिकारी हे येत्या 9 डिसेंबर रोजी विधानसभेत मांडण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,राज्याच्या नामांतराच्या प्रस्तावासाठीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
इंग्रजीत पश्चिम बंगाल या राज्याला वेस्ट बंगाल असे संबोधले जाते. हे नावही लवकरच बदलले जाणार आहे.
विधानसभेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर बंगालच्या नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.