जयेश विनायकराव गावंडे
अयोध्या येथे होत असलेल्या श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अकोल्यात भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून साजरा करण्यात येत आहे. भाजपने 331 किलोंचा लाडू तयार केला आहे.
अकोल्यातील राजकारण हिंदुत्वाधारित आहे. ही बाब लक्षात घेता येथील उत्सवांमध्ये भाजप, शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटना नेहमीच आघाडीवर असतात.
भाजपशी संलग्नित पदाधिकाऱ्यांनी 22 जानेवारीला 331 किलोंचा रामप्रसाद लाडू श्रीरामाला अर्पण करण्याचा निश्चय केला आहे.
अकोल्यात संत श्री गजानन महाराज यांच्या पावनस्पर्श झालेले पुरातन श्रीराम मंदिर आहे. तेथे रामप्रसाद लाडुचा उपक्रम हाती घेण्यात आला.
श्रीराम मंदिराजवळ असलेल्या शालिनी टॉकीजच्या गल्लीत महाप्रसाद तयार करण्यात आला. यात 331 किलोंच्या रामप्रसाद लाडूचा समावेश आहे.
अकोल्यात भाजपसह शिवसेनेच्या दोन्ही गटांनी श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मतांची पेरणी सुरू केली आहे.
अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाचीही जोरदार बॅनरबाजी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस मात्र यात मागे आहे.
भाजपशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी तयार केलेला अकोल्यातील 331 किलोंचा रामप्रसाद लाडू सध्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.