Roshan More
राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त राकेश सिन्हा, राम शकल, सोनल मानसिंग आणि महेश जेठमलानी हे चार सदस्य शनिवारी निवृत्त झाले आहेत.
राकेश सिन्हा हे आरएसएसचे विचारवंत आणि दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक होते. त्यांची 2018 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी राज्यसभेवर नियुक्ती केली होती.
राम शकल हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. शेतकरी नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
सोनल मानसिंग या भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य शैलीच्या गुरु आहेत. त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतींनी नियुक्ती केली होती. सोनल मानसिंग या पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित आहेत.
महेश जेठमलानी हे प्रसिद्ध वकील आहेत. हायप्रोफाईल केस त्यांनी लढल्या आहेत. प्रसिद्ध वकील,माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांचे ते पुत्र आहेत.
राष्ट्रपती नियुक्त चार सदस्य शनिवारी निवृत्त झाल्याने भाजपचे संख्या 86 पर्यंत खाली घसरले आहे. त्यामुळे राज्यसभेत भाजपचे बहुमत नाही.
उपराष्ट्रपती जगदीश धनखड हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
राज्यसभेत बहुमतासाठी 245 पैकी 113 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. एनडीएला आणखी सात नामनिर्देशित खासदारांसह एका अपक्ष सदस्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे एनडीएचा आकडा 107 पर्यंत पोहचतो.