भाजपच्या ‘या’ ग्लॅमरस महिला आमदाराने सरकारलाच आणलं अडचणीत

Rajanand More

नौक्षम चौधरी

लंडन शिक्षण उच्च शिक्षण घेतलेल्या नौक्षम चौधरी कॉर्पोरेट आणि ग्लॅमर जगतात जाण्याच्या तयारीत होत्या. सिंगापूरमध्ये फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्या काम करत होत्या. पण अचानक त्यांनी आपला मार्ग बदलला अन् राजकारणात आल्या.

Nauksham Chaudhary | Sarkarnama

आमदार

नौक्षम या भाजपच्या राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील कामा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या आहेत.

Nauksham Chaudhary | Sarkarnama

वादग्रस्त विधाने

ग्लॅमरस लुक असलेल्या आमदार नौक्षम या आपल्या वादग्रस्त विधानांमुळेही प्रसिध्द आहेत. नुकतेच त्यांनी आपल्यास सरकारविरोधात विधान करत विरोधकांच्या हाती आयते कोलित दिले आहे.

Nauksham Chaudhary | Sarkarnama

निर्णयांवर प्रश्न

राजस्थान सरकारच्या विविध योजना व निर्णयांवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यावरून काँग्रेसने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राजस्थानमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे.

Nauksham Chaudhary | Sarkarnama

ताकीद

पक्षाने नौक्षण यांना वादग्रस्त विधाने न करण्याची ताकीद दिली आहे. तसेच त्यांच्याविरोधात काही गावांतील सरपंच आणि लोकप्रतिनिधींनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Nauksham Chaudhary | Sarkarnama

लोकप्रिय

नौक्षम या सोशल मीडियात लोकप्रिय आहेत. विविध कार्यक्रमांचे फोटो, व्हिडीओ त्या सतत शेअर करत असतात. ग्लॅमर आणि राजकारणाचा अनोख संगम त्यातून दिसतो.

Nauksham Chaudhary | Sarkarnama

एकदा पराभव

नौक्षम यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा हरियाणातून विधानसभेची निवडणूक लढली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भाजपने 2023 मध्ये राजस्थानातून त्यांना उमेदवारी दिली.  

Nauksham Chaudhary | Sarkarnama

वडील जज

नौक्षम यांचे वडील न्यायाधीश असून आई आयएएस आहेत. नौक्षण यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले असून मिलान येथून फॅशन अन्ड ब्रँड मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केली आहे.

Nauksham Chaudhary | Sarkarnama

NEXT : ‘शिवतीर्थ’वर बाप्पासमोर ठाकरे बंधूंनी जोडले हात; 22 वर्षांची प्रतिक्षा संपली, पाहा खास फोटो...

येथे क्लिक करा.