‘शिवतीर्थ’वर बाप्पासमोर ठाकरे बंधूंनी जोडले हात; 22 वर्षांची प्रतिक्षा संपली, पाहा खास फोटो...

Rajanand More

गणरायाचे आगमन

लाडक्या गणरायाचे आज वाजतगाजत घरोघरी आगमन झाले. रांगोळीच्या पायघड्या, फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताश्यांच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले.

Ganesh Festival | Sarkarnama

‘शिवतीर्थ’वर उत्साह

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी बाप्पांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सर्व ठाकरे कुटुंबीय यावेळी एकत्र आले होते.

Uddhav-raj Thackeray Family | Sarkarnama

विशेष महत्व

यंदाचा गणेशोत्सव ठाकरे कुटुंबीयांसाठी खास ठरला. तब्बल 22 वर्षांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या घराची पायरी चढली.

Uddhav Thackeray | Sarkarnama

सहकुटुंब दर्शन

उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदारपुत्र आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्तवर जात गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी इतर कुटुंबीयही उपस्थित होते.

Aaditya Thackeray | Sarkarnama

खास मेजवानी

गणरायाच्या आगमनानिमित्त राज यांनी बंधू उद्धव यांना खास निमंत्रण दिले होते. त्यानुसार ते सहकुटुंब आले होते. त्यांच्यासाठी राज ठाकरेंनी शिवतीर्थवर खास मेजवानीचे आयोजन केले होते.

Uddhav-raj Thackeray Family | Sarkarnama

दोन तासांची भेट

उद्धव ठाकरे हे कुटुंबासह जवळपास दोन तास शिवतीर्थवर होते. यादरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंमध्येच सुमारे दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.

Uddhav-raj Thackeray Family | Sarkarnama

खास फोटो

दोन्ही बंधूंचे शिवतीर्थमधील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यातील एक फोटो खास आहे. या फोटोमध्ये दोन्ही बंधूंच्या मागे प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांचे स्केच असलेला फोटो आहे.

Uddhav-raj Thackeray | Sarkarnama

कौटुंबिक सोहळा

गणरायाचे स्वागत करताना शिवतीर्थवर जणू कौटुंबिळ सोहळा होता. सर्व कुटुंबीयांचे एकत्रित फोटोही समोर आले आहेत. त्यामुळे त्याचीच चर्चा सर्वत्र होत आहे.   

Uddhav-raj Thackeray Family | Sarkarnama

NEXT : सुप्रीम कोर्टातील नियुक्ती वादात; मुळचे गुजरातचे न्यायमूर्ती विपुल पांचोलींचा असा आहे इतिहास

येथे क्लिक करा.