Rajanand More
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर महापालिकेत महिला महापौर होणार आहे.
महापौरपदासाठी भाजपमधून नगरसेविका शिवानी दाणी या नावाची बरीच चर्चा होत आहे. पहिल्यांदाच नगरसेवक होऊनही थेट महापौरपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही आरक्षण जाहीर होताच थेट शिवानी यांचे नाव घेत त्यांना महापौर करण्यासाठीच सर्वसाधारण महिला अशी सोडत ठरवून काढण्यात आल्याचा आरोप केला.
शिवानी या सध्या मुख्यमंत्री कार्यालयातील विदर्भ विभागाच्या गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करत आहेत. त्यामुळे सीएम देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा थेट संपर्क आहे.
भाजपच्या तरूण नेत्यांच्या फळीतील शिवानी या आघाडीच्या नेत्या आहेत. पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारीही त्यांनी अत्यंत दमदारपणे पार पाडली आहे.
दाणी यांनी एबीव्हीपीच्या माध्यमातून सामाजिक आणि नंतर राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. त्या भारतीय जनता युवा मोर्चा आणि नंतर भाजपमध्ये सक्रीय झाल्या.
शिवानी दाणी यांच्यासह त्यांचे कुटूंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. राष्ट्र सेविका समितीमध्ये त्या लहानपणापासूनच सक्रीय होत्या.
शिवानी या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी संगणक विषयातून पदवी प्राप्त केली आहे. तसेच मनी बी इन्स्टिट्यूट या संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत.