Ganesh Sonawane
मंत्री गिरीश महाजन यांना भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाते
नाशिकमध्ये सध्या पक्षांतर्गत वातावरण तापलेले असताना दुसरीकडे महाजन यांनी शांततेचा शिडकाव करत बोट क्लबमध्ये असा बोटिंगचा आनंद घेतला
नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्रात महाजन यांनी "स्पीड बोट"चा आनंद घेतला.
पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थकारणाला चालना देण्यासाठी विविध सेवा व सुविधा गंगापूर धरण व परिसरात सुरू करण्यात आल्या आहेत.
वेग, थरार आणि उत्साहाने भरलेला हा क्षण उपस्थितांसाठी आकर्षण ठरला.
दुसऱ्यादिवशी, गंगापूर धरण परिसरात भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण विमानाच्या चित्तथरारक 'एअर शो' ला देखील महाजन उपस्थितीत होते.
या 'एअर शो' मध्ये भारतीय वायुदलातील अत्यंत नामांकित वैमानिकांनी आपल्या शौर्याचे व कौशल्याचे अतुलनीय दर्शन नाशिककरांना घडवले.
हा एअर शो माझ्यासाठीही आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली.