सरकारनामा ब्यूरो
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा आज वाढदिवस.
आरएसएसचा स्वयंसेवक, पतित पावन संघटना, भाजपचे कार्यकर्ते असलेले मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदा शिक्षण मंडळाचे सदस्य होते.
शिक्षणमंडळाचे सदस्यत्व मिळाल्यानंतर भाजपामध्ये सक्रीय होऊन महापालिकेच्या राजकारणात उतरले.
महापालिकेच्या २००३ च्या पोटनिवडणुकीत विजयी होऊन पहिल्यांदा नगरसेवक झाले.
पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीतनंतर भाजपची सत्ता येताच स्थायी समितीचे अध्यक्ष झाले.
कोरोना काळात पुणे शहरासाठी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमुळे मुरलीधर मोहोळ चर्चेत आले.
महापौरपद मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळांनी शहराच्या राजकारणावर पकड ठेवली.
पुणे लोकसभा मतदार संघातून मुरलीधर मोहोळ इच्छुक असल्याची चर्चा आहे.