सरकारनामा ब्यूरो
मुंबई महापालिकेचा 2025 चाअर्थसंकल्प सादर झाला. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगरानी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.
2025 च्या अर्थसंकल्पात तब्बल 74 हजार 427.41 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
2025 च्या बजेटमध्ये आरोग्य, शिक्षण, बेस्ट, कोस्टल रोड प्रकल्प, गोरेगाव मुलुंड, लिंक रोड 32 हजार 782 कोटीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबईतील पर्यटनवाढीवर भर देण्याचे ठरवत त्यासंदर्भात म्हत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये पेंग्विन,झेब्रा,जिराफ यांच्या विदेशी प्रजातींच्या प्राण्यांना राणीच्या बागेत आणले जाणार आहे.
मुंबई शहरातील वाढती लोकसंख्या पाहता नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीसुविधांसाठी 7 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
2025-26 च्या अर्थसंकल्पात दहिसर ते भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी 4300 कोटी, तर गोरेगाव मुलुंड लिंक रोड साठी 1958 कोटींची मोठी तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेने कोळीवाड्याच्या विकासकामासाठी 25 हजार कोटी रुपयांची अर्थिक मदत करण्याची घोषणा यात केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शंभर शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑरगॅनिक फार्मिंग किचन गार्डन या पद्धतीने शेती करण्याचे धोरण राबवले जाणार असून यातून शेतीविषयक अत्यधुनिक माहिती मिळणार आहे.