सरकारनामा ब्यूरो
पुढील काही दिवसांवर मुंबई महापालिका निवडणुक येऊन ठेपली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना मोठे आव्हान असणार आहे.
पक्ष फूटीनंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुंबईत किती ताकद आहे जाणून घेऊयात...
माहीम, वरळी, शिवडी, भायखळा या चार मतदार संघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मजबुत स्थिती आहे., मुंबईत ठाकरेंचे एकुण दहा आमदार आहेत, जाणून घेऊ मतदारसंघ आणि विद्यमान आमदार
वरळी येथे आदित्य ठाकरे आणि वांद्रे पूर्व येथून वरुण सरदेसाई ही मावस भावांची जोडी आमदार आहे.
विक्रोळी येथे सुनील राऊत तर दिंडोशी येथे सुनिल प्रभू हे आमदार आहेत
शिवडी येथे अजय चौधरी तर भायखळा येथे मनोज जामसूतकर हे आमदार आहेत.
कलिना येथे संजय पोतनीस तर माहीम येथे महेश सावंत हे आमदार आहेत.
जोगेश्वरी पूर्व याठिकाणी अनंत (बाळा) नर तर वर्सोवा येथुन हरुन खान हे आमदार आहेत