सरकारनामा ब्यूरो
प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत 238 जागा लढवल्या, पण पक्षाला खातेही उघडता आले नाही. 236 जागांवर डिपॉझिट जप्त झाले.
पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी भितिहरवा गांधी आश्रमात एक दिवसाचे 'मौन उपोषण' करून आत्मचिंतन केले.
पराभवाने खचून न जाता, ते राज्यातील १ लाख १८ हजार वॉर्डांमध्ये फिरणार आहेत. आणि शासकीय योजनांचे फॉर्म भरून घेणार आहेत.
९०% संपत्ती दान करणार असल्याची केली घोषणा.. गेल्या २० वर्षांत कमावलेली ९०% संपत्ती बिहारच्या जनतेसाठी दान करण्याची शपथ प्रशांत किशोर यांनी घेतली आहे.
प्रशांत किशोर यांनी खुलासा केला की, निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांनी गेल्या 3 वर्षांत 241 कोटी रुपये कमावले आहेत.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या PK यांची संपत्ती ५५ ते ६० कोटींच्या घरात आहे. आधीच त्यांनी ९९ कोटी पक्षनिधीत दिले आहेत, तर ३१ कोटी GST
२० कोटी आयकर देखील भरला आहे.
दिल्लीतील घर वगळता गेल्या २० वर्षांत कमावलेले सर्वकाही बिहारसाठी दान करणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा त्यांनी केली आहे.
आता कोणत्याही पक्षासाठी कन्सल्टन्सी करणार नसून केवळ बिहारसाठी काम करणार. प्रशांत किशोर यांनी बिहारच्या जनतेला जनसुराजशी जोडण्यासाठी १००० रुपये देणगी देण्याचे आवाहन केले आहे.