Rajanand More
गँगस्टर अरूण गवळी याचा राजकारणातील वारसा त्याची लेक गीता गवळी या चालवत आहेत.
गीता या माजी नगरसेविका आहेत. मुंबईतील भायखळ्यातील वार्ड क्रमांक २१२ मधून त्या २०१७ च्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या.
तुरुंगात असलेल्या अरूण गवळीने २००४ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ९२ हजार मते पडली होती.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गीता गवळी यांनी तयारी सुरू केली आहे.
गीता यांनी रविवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यावरून आता चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी गीता गवळी यांची भेट घेतली होती. भायखळा परिसरात गवळी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आता पालिका निवडणुकीसाठीही गवळींची ताकद महत्वाची आहे.
गवळी यांनी निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्यास ठाकरेंसाठी हा धक्का असेल. भायखळा व परिसरात भाजपची ताकद वाढू शकते.
गीता गवळी या आता काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. तसेच त्यांच्या निर्णयाचा कोणत्या पक्षाला किती फायदा होणार, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.