Jagdish Patil
रविवारी (ता.15) उत्तराखंडमध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला. यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात हेलिकॉप्टरचे पायलट राजबीर सिंग चौहान यांचा देखील मृत्यू झाला.
जयपूरचे रहिवासी असलेले राजबीर सिंग चौहान यांनी 15 वर्षांहून अधिक काळ भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे.
त्यांना कोणत्याही ऋतूमध्ये हेलिकॉप्टरचे उड्डाण करण्याचा मोठा अनुभव होता.
महत्वाची बाब म्हणजे पायलट चौहान यांची पत्नी देखील भारतीय सैन्यात सेवा बजावते. चार महिन्यांपूर्वीच ते जुळ्या मुलांचे वडील बनले होते.
राजबीर यांनी भारतीय सैन्यात काम केल्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या हेलिकॉप्टर आणि त्यांच्या देखभालीचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
39 वर्षीय राजबीर सिंग हे मूळचे दौसा जिल्ह्यातील महवा येथील रहिवासी होते. मात्र, सध्या त्यांचे कुटुंब जयपूरमध्ये राहते.