Rashmi Mane
बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीची सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://portal.mcgm.gov.in/Forprospects/Careers-All पाहता येईल.
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शीव येथे ही भरती केली जाणार आहे. या भरतीची प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबवण्यात येणार आहे. एकूण १९ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑडिओलॉजी सह स्पीच थेरपिस्ट, स्पीच थेरपीस्ट-सी ऑडिओलॉजिस्ट, ब्लड बँक टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन आणि नेत्रतज्ज्ञ या पदांचा समावेश आहे.
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट: पदव्युत्तर पदवी
ऑडिओलॉजी व स्पीच थेरपी: संबंधित पदवी
ईसीजी टेक्निशियन: 12 वी (विज्ञान) + B.Sc कार्डिओ टेक्नोलॉजी
लॅब टेक्निशियन: B.Sc पॅरामेडिकल + इंटर्नशिप
या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज 1 ऑगस्ट 2025 पूर्वी एलटीएमएस रुग्णालयाच्या आवक विभागात पोहोचणे आवश्यक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 20,000 ते 50,000 रुपयांपर्यंत मिळेल. ही भरती कंत्राटी पद्धतीने असल्याने नियुक्ती कालमर्यादित असेल.
महानगरपालिकेच्या या भरतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. इच्छुकांनी पात्रता निकष नीट तपासून अर्ज करावा.