1 ऑगस्टपासून बदलणार 6 मोठे नियम; क्रेडिट कार्ड, UPI, LPGवर होणार मोठा परिणाम!

Rashmi Mane

ऑगस्टपासून बदलणार 6 मोठे नियम!

तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, जाणून घ्या काय बदल होणार आहे!

Rule Change from 1 August | Sarkarnama

सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम

1 ऑगस्ट 2025 पासून देशभरात अनेक आर्थिक नियम बदलणार असून, या बदलांचा थेट प्रभाव सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि मासिक बजेटवर होणार आहे.

New Rules From 1 June 2025 | Sarkarnama

क्रेडिट कार्ड नियमात बदल

11 ऑगस्टपासून SBI च्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर मिळणारा मोफत एअर ॲक्सिडेंट इन्शुरन्स बंद होणार आहे. आधी मिळत होतं 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कव्हर!

New Rules From 1 June 2025 | Sarkarnama

LPG गॅसचे नवे दर

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरचे दर बदलतात. या वेळी घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे. कमर्शियल सिलिंडरचे दर मात्र बदलले आहेत.

New Rules From 1 June 2025 | Sarkarnama

UPI मध्ये मोठा बदल

1 ऑगस्टपासून NPCI ने नवे नियम आणले आहेत. एका दिवसात फक्त 50 वेळा बॅलन्स चेक करता येणार. बँक अकाउंट लिंक फक्त 25 वेळा तपासता येणार. AutoPay ट्रान्झॅक्शन ठराविक स्लॉटमध्येच प्रोसेस होणार.

UPI new rules 2025 | Sarkarnama

UPI ट्रान्झॅक्शनवर मर्यादा

UPI ट्रान्झॅक्शनवरही मर्यादा आल्या आहेत. फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनचा स्टेटस फक्त 3 वेळा तपासता येणार आहे. प्रत्येक चेकमध्ये 90 सेकंदाचा गॅप असणे आवश्यक आहे.

UPI Rule Change | Sarkarnama

CNG आणि PNG चे दर

एप्रिलपासून CNG, PNG चे दर बदललेले नाहीत. शेवटचा बदल 9 एप्रिलला झाला होता.
पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बँक सुट्ट्या

ऑगस्टमध्ये तुमच्या बँकेच्या सुट्ट्या तपासा! RBI च्या नियमानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या असतील.

ATF चे नवे दर

1 ऑगस्टपासून एअर टर्बाइन फ्यूलच्या किमतीत बदल होणार आहे. त्यामुळे एअरलाईन तिकिटांच्या किमतींवर थेट परिणाम होणार आहे.

Next : फुकटात UPI पेमेंटचा काळ संपणार? ग्राहकांना मोजावी लागणार किंमत?

येथे क्लिक करा