Rashmi Mane
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
महानगरपालिकेअंतर्गत नागरी तंत्रज्ञानावर आधारित इनक्युबेशन सेंटरसाठी इन्क्युबेशन मॅनेजर या पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी स्माईल काउन्सिल आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यावतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे अभियांत्रिकी, अर्थशास्त्र किंवा कॉमर्समधील पदवी असणे आवश्यक आहे.
तसेच उद्योजकता, मार्केटिंग किंवा स्पेशलायझेशनमध्ये एमबीए केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जदाराकडे 3 ते 5 वर्षांचा अनुभव असणे अपेक्षित आहे.
या भरतीसाठी कामाचे ठिकाण अंधेरी किंवा वरळी, मुंबई येथे असणार आहे.
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखतीची तारीख नंतर कळवली जाईल.