Rashmi Mane
3 आणि 4 सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची महत्त्वाची बैठक होणार आहे.
या बैठकीत सर्वसामान्यांशी निगडित मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, जवळपास 175 वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यावर चर्चा होणार आहे. या वस्तूंवरील करात सरासरी 10 टक्क्यांनी कपात केली जाऊ शकते.
पर्सनल केअर उत्पादनांमध्ये टॅलक्म पावडर, टूथपेस्ट, शॅम्पू यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून थेट 5 टक्क्यांवर आणण्याची शक्यता आहे.
यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हर, गोदरेज यांसारख्या कंपन्यांना फायदा होणार असून ग्राहकांनाही स्वस्त दरात वस्तू मिळतील.
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात एसी आणि टीव्हीवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. यामुळे सॅमसंग, एलजी यांसारख्या कंपन्यांची विक्री वाढण्याची अपेक्षा आहे.
वाहन उद्योगालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लहान हायब्रिड कारवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. यामुळे मारुती सुझुकी आणि टोयोटा यांना मोठा फायदा होईल.
एकंदरीत, जीएसटी सुधारणा आणि सुसूत्रीकरणामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. ग्राहकांवरचा आर्थिक भार कमी होण्यासोबतच उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळू शकतो.