सरकारनामा ब्यूरो
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका हेड काॅन्सटेबलचा फोटो व्हायरल झाला होता. कोण आहेत ते जाणून घेऊयात...
तेजेंद्र सिंग असे या व्हायरल फोटोतील व्यक्तीचे नाव असून ते उत्तराखंडमधील देहरादून येथे हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोवर अनेक युजर्सने कमेंट्स केलेल्या आहेत. तेजेंद्र यांनी बायसेप्स दाखवत अनेक व्हिडिओही तयार केले आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
अनेक युजर्स म्हणाले की, पोलीस नसून बाॅडी बिल्डर आहेत. तर कोण म्हणत होते की हे पोलीस असूच शकत नाही.
तेजेंद्र म्हणाले, ' जो फोटो व्हायरल होत आहे ते फोटो लॉकडाऊनपूर्वीचा असून यात त्यांच्या बायसेप्सचा आकार 21 इंच इतका आहे.
तेजेंद्र सिंग यांनी लंडनमध्ये झालेल्या जागतिक पोलिस आणि फायर गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच 2006 ला पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर विभागीय स्पर्धा पहिल्यांदाच राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवले.
2009 ला त्यांनी मिस्टर 'हरक्यूलिस' ही पदवी जिंकली आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक राष्ट्रीय पदकेही मिळवली आहेत.
ते पोलिस कॉन्स्टेबल म्हणून अनेक स्पर्धांमध्येही सहभागी होतात. त्यांनी सांगितले की,'माझे वजन सुमारे 95 किलो असून मी प्रोटीनसाठी 1 किलो चिकन आणि 15 अंडी असा रोज आहार घेतो.