Pradeep Pendhare
सलमान खानला वाय प्लस सुरक्षा मिळाली आहे. त्यात शस्त्रधारी 11 सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
सुरक्षेत तैनात असलेल्या रक्षकांकडे आधुनिक पिस्तूल, आधुनिक MP5 गन आणि AK47 सारखी शस्त्रेही आहेत.
सलमानकडे स्वतः 32 कॅलिबर पिस्तूल आहे, ज्याचा परवाना त्याला काही काळापूर्वी मुंबई पोलिसांनी दिला आहे.
या सरकारी सुरक्षे व्यवस्थेसह सलमान खानसोबत जवळपास 35 खासगी बॉडी गार्डही आहेत.
सलमान खानची सुरक्षा व्यवस्था एकूण सुरक्षा तीन थरांमध्ये आहे. गरज पडल्यास खासगी सुरक्षा रक्षकांची संख्याही वाढवली जाते.
25 हून अधिक सशस्त्र पोलिस 24 तास सलमानच्या घराबाहेर असतात.
सलमान खानसोबतच्या ताफ्यात 8-9 वाहने आहेत, त्यापैकी 4 वाहने पोलिसांची आहेत. तो स्वत: ब्रुलेटप्रूफ वाहनातून प्रवास करतो.
अभिनेता सलमान खान हा राष्ट्रवादी काँग्रेसचे हत्या झालेले नेते आमदार बाबा सिद्दिकी यांच्या जवळचा मित्र आहे.