List Of Bollywood Celebs : बॉलिवूड सुपरस्टार राजकारणात झाले सुपर फ्लॉप

Rashmi Mane

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये अलाहाबादची जागा लढवली आणि 68.2 टक्के मतांनी जिंकली,1987 मध्ये, बोफोर्स घोटाळ्यातील त्यांच्या सहभागाभोवती असलेल्या अटकळांमुळे त्यांनी राजीनामा दिला.

List Of Bollywood Celebs Who Failed in Politics | Sarkarnama

ऊर्मिला मातोंडकर

ऊर्मिला मातोंडकर यांनी 2019 ला काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता त्या शिवसेनेत आहेत.

List Of Bollywood Celebs Who Failed in Politics | Sarkarnama

रजनीकांत

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी 2018 मध्ये रजनी मक्कल मंद्रम पक्ष स्थापन केला होता. मात्र, तीन वर्षांनंतर त्यांनी पक्ष विसर्जित करण्याची घोषणा केली.

List Of Bollywood Celebs Who Failed in Politics | Sarkarnama

महेश मांजरेकर

अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 2014 मध्ये मनसेचे उमेदवार म्हणून मुंबई उत्तर पश्चिममधून लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

List Of Bollywood Celebs Who Failed in Politics | Sarkarnama

राखी सावंत

राखी सावंतने 2014 मध्ये राष्ट्रीय आम पार्टीत एन्ट्री केली होती. राखीने निवडणूक लढवली, पण तिला नऊ लाख मतांपैकी केवळ 2,000 मते मिळाली. नंतर ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मध्ये सामील झाली.

List Of Bollywood Celebs Who Failed in Politics | Sarkarnama

शेखर सुमन

शेखर सुमन यांनी 2009 मध्ये पटना साहिब मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

List Of Bollywood Celebs Who Failed in Politics | Sarkarnama

गुल पनाग

अभिनेत्री गुल पनागने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत (चंदीगडमधून AAP च्या) तिकिटावर निवडणूक लढवून राजकारणात प्रवेश केला. मात्र, ती पराभूत झाली.

List Of Bollywood Celebs Who Failed in Politics | Sarkarnama

धर्मेंद्र

अभिनेते धर्मेंद्र यांनी 2004 ते 2009 पर्यंत बिकानेरचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, चित्रपटांच्या शूटिंगमध्ये वेळ जात असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीवर टीका झाली.

List Of Bollywood Celebs Who Failed in Politics | Sarkarnama

संजय दत्त

संजय दत्तने 2009 मध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मात्र, शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्याने त्याने आपली उमेदवारी मागे घेतली. नंतर त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली, पण त्यांनी पक्ष सोडला.

R

List Of Bollywood Celebs Who Failed in Politics | Sarkarnama

Next : काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या स्नुषा भाजपमध्ये?; कोण आहेत डॉ.अर्चना पाटील

येथे क्लिक करा