Mangesh Mahale
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे यानं बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.
'निशांची' हा त्याचा सिनेमा तीन महिन्यापूर्वी प्रदर्शित झाला होता.हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.
थिएटरमध्ये हा सिनेमा फारसा चालला नाही. पण हाच सिनेमा आता ओटीटीवर टॉप ट्रेडिंगमध्ये आहे.
ऐश्वर्य हा बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र दिवंगत जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे.
ठाकरे कुटुंबिय राजकारण असले तरी ऐश्वर्य याने फिल्म इंडस्ट्रीकडे जाणे पसंत केले आहे.
ऐश्वर्य याने 2015 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी'सिनेमासाठी असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले.
अनुराग कश्यप यांच्या 'निशांची' चित्रपटातून त्याने अभिनयाच्या विश्वात पाऊल ठेवत असून ही दोन भावांची कथा आहे.
नृत्याच्या दुनियेतील 'किंग'मायकल जैक्सन हा त्याचा आदर्श आहे.ऐश्वर्याच्या अभिनयाबरोबर त्याच्या डान्सचेही कौतुक होते.