Pradeep Pendhare
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीचे चालक अशोक भद्रिगे यांनी वकिलीची सदन मिळवल्याने कौतुक होत आहे.
अशोक भद्रिगे हे मूळचे पुण्यामधील जुन्नर इथल्या आळेफाट्याचे असून, मुंबईत वास्तव्याला असताना भायखळ्याच्या डायमंड ज्युबिली हायस्कूलमध्ये शिक्षण झाले.
अशोक भद्रिगे यांची मुंबई उच्च न्यायालयात चालकपदी निवड झाली. 2010 पूर्णवेळ चालक म्हणून रुजू झाल्यानंतर ते न्यायमूर्तींच्या वाहनावर सेवा बजावू लागले.
विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई उच्च न्यायालयात असताना त्यांच्याकडे दीड वर्षे अशोक भद्रिगे यांनी चालक म्हणून त्यांनी काम केले.
अशोक भद्रिगे यांनी वकिलीच्या शिक्षणासाठी 2019मध्ये सीईटी परीक्षा दिली. तत्पूर्वी ते 2016 पासून जुलै 2024 पर्यंत न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्याकडे चालक होते.
चेंबूर कर्नाटकाच्या विधि महाविद्यालयात 2020मध्ये प्रवेशानंतर चार वर्षांनी अशोक भद्रिगे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले.
अशोक भद्रिगे यांची बहिणीने देखील वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं असून, दोघांनी बरोबरच अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता.
विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवईंचा खूप प्रभाव पडल्याने, त्यांच्याकडून वकील होण्याची खरी प्रेरणा मिळाल्याचे अशोक भद्रिगे सांगतात.
आपल्या या यशोगाथेचे कोणाला श्रेय देताना, अशोक भद्रिगे यांनी 'थँक यू बाबासाहेब...', असे म्हटलं आहे.