'बॉम्बे महाराष्ट्राचे शहर नाही!' भाजप नेते अण्णामलाईंच्या वक्तव्यामुळे नवा वाद : पण मुंबईला 'बॉम्बे' नाव कोणी दिलं होतं?

Jagdish Patil

अण्णामलाई

भाजप नेते के. अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत, 'बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही. तर हे आंतरराष्ट्रीय शहर आहे', असं वादग्रस्त वक्तव्य केलं.

Annamalai Statement | Sarkarnama

भाजप

त्यांच्या या वक्तव्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात विरोधकांना भाजपवर टीका करण्यासाठी आयत कोलीत मिळालं आहे.

Devendra Fadnavis | sarkarnama

इतिहास

याच पार्श्वभूमीवर मुंबईला बॉम्बे हे नावं कोणी दिलं होतं आणि त्याचा इतिहास नेमका काय आहे ते जाणून घेऊया.

Bombay vs Mumbai | City Name History | Sarkarnama

स्वप्ननगरी

मुंबईची जगभरात स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते. समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हे सुंदर आणि व्यावसायिक शहर आहे.

Bombay vs Mumbai | City Name History | Sarkarnama

राजधानी

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मुंबईचं मोठं योगदान असल्यामुळेच या शहराला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं.

Bombay vs Mumbai | City Name History | Sarkarnama

बंबई

या शहराला कुणी बॉम्बे, तर कुणी बंबई म्हणायचं. तसंच मुंबा, मुंबापुरी या नावांनीही मुंबई ओळखली जायची.

Bombay vs Mumbai | City Name History | Sarkarnama

बॉम्बे

या सर्वांमध्ये 'बॉम्बे' या नावाचा वापर जास्त प्रमाणात केला गेला. तरीही इतिहासात मुंबई नावाचेच अनेक संदर्भ आढळतात..

Bombay vs Mumbai | City Name History | Sarkarnama

मुंबादेवी

कोळी मच्छीमार समुदायाची देवी मुंबादेवीच्या नावावरून या शहराला मुंबई हे नाव पडलं.

Bombay vs Mumbai | City Name History

बॉम्बेम

युरोपियन आक्रमणादरम्यान पोर्तुगीज लोकांनी या शहराला 'बॉम्बेम' म्हणून संबोधलं होतं. बॉम्बेमचा अर्थ 'गुड बे' म्हणजे चांगले बंदर.

Bombay vs Mumbai | City Name History | Sarkarnama

ईस्ट इंडिया कंपनी

सतराव्या शतकात ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय सुरतहून मुंबईत आणले तेव्हा त्यांनी 'बॉम्बेम'चे 'बॉम्बे' असे नाव केले.

Bombay vs Mumbai | City Name History

मुंबई

तेव्हापासून 'बॉम्बे' नाव प्रचलित झालं. मात्र, शिवसेनेच्या पुढाकारामुळे नोव्हेंबर 1995 मध्ये केंद्र सरकारने अधिकृतपणे या शहराचे नाव मुंबई असे केले.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

NEXT : ज्यासाठी ठाकरे बंधू एकत्र अन् भाजप पूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरलंय; त्या मुंबई महापालिकेचा महापौर कसा निवडतात?

BMC Mayor Election Process | Sarkarnama
क्लिक करा