Rashmi Mane
भारतीय रेल्वेने अलीकडेच RailOne नावाचे नवे मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे प्रवाशांना सहजपणे तिकीट बुकिंगपासून खाद्यपदार्थ ऑर्डरपर्यंत अनेक सुविधा मिळणार आहेत,
हे अॅप जुन्या वेबसाइटपेक्षा फास्ट आहे आणि वापरण्यास अगदी सोपे आहे. लॉग-इन केल्यानंतर तुम्हाला विविध पर्याय दिसतील.
या अॅपमध्ये तुम्ही रिझर्वेशन तिकीट, अनरिझर्व तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट सहज खरेदी करू शकता.
रिझर्वेशनचा पर्याय निवडल्यानंतर प्रवासाची तारीख, कोटा, प्रस्थान स्टेशन आणि गंतव्य स्टेशन टाकावे लागेल.
डिटेल्स भरल्यानंतर ट्रेन सर्च करा. त्यानंतर कोणत्या ट्रेनमध्ये सीट उपलब्ध आहे हे पाहता येते.
पसंतीचा क्लास (Sleeper, 3AC, 2AC इ.) निवडल्यानंतर प्रवाशांची माहिती भरावी लागते.
भरलेली माहिती नीट तपासून घ्या. नंतर UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करून बुकिंग पूर्ण करा.
RailOne अॅपवर फक्त तिकीट बुकिंग नाही तर ट्रेन स्टेटस, कोच पोजिशन, PNR स्टेटस तपासणे आणि फूड ऑर्डर करणे शक्य आहे.
हे नवे अॅप जलद, आधुनिक आणि सोयीस्कर असल्याने प्रवासाची तयारी करणे अधिक सोपे झाले आहे.