Jagdish Patil
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.
उपराष्ट्रपतीपदी निवड होताच सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे.
राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवला आहे.
त्यामुळे आता आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल असणार आहेत. याबाबतचे निवदेन राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलं आहे.
आचार्य देवव्रत यांचा जन्म हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तहसीलमध्ये झाला आहे.
ते एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि प्रमुख राजकारणी आहेत.
आचार्य देवव्रत यांनी यापूर्वी कुरुक्षेत्र, हरियाणा येथील गुरुकुलाचे प्राचार्य म्हणून काम केलं आहे.
ते 2019 पासून गुजरातचे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. याआधी ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.