सरकारनामा ब्यूरो
परकीय देशाच्या आक्रमणापासून भारताचे सीमा रक्षण करणारी 'बीएसएफ' संस्था आहे.
आज 'बीएसएफ'चा 59वा वर्धापनदिन आहे.
देशात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे जवान तैनात केलेले असतात.
दिवसरात्र भारतीय सीमेवर तैनात असणारे 'बीएसएफ' हे जगातील सर्वात मोठे सुरक्षा दल आहे.
शांततेच्या काळात आणि युद्धाच्या काळात सक्रिय भूमिका पार पाडण्याच्या महत्त्वाच्या भूमिका या दलाकडे आहेत.
सीमा प्रदेशात राहणाऱ्या जनतेत सुरक्षिततेची भावना जोपासणे
सीमापार गुन्हे आणि अवैध प्रवेशावर प्रतिबंध लादणे तसेच चोरीची आयात-निर्यात आणि इतर कारवाईंवर नियंत्रण ठेवणे.
धोक्याच्या क्षेत्रांमध्ये शत्रूविरुद्ध दल उभारणे आणि देशातील महत्त्वाचा ठिकाणाचे संरक्षण करणे.
शत्रूंवर नियंत्रण करून धोक्याच्या क्षेत्रात घुसखोरीविरोधात कारवाई करणे