Deepak Kulkarni
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या पुणे दौऱ्यावर आहेत.
राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानंतर त्या प्रथमच पुण्यात आल्या आहेत.
त्यांचा हा महाराष्ट्र दोरा अनेक कारणांसाठी विशेष ठरला आहे. त्यांनी गुरुवारी सकाळी शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर जात शनिदेवाला तैलाभिषेक केला.
यानंतर पुण्यात आलेल्या देशाच्या दोन महिला राष्ट्रपतींची अनोखी भेट झाली आहे.
द्रौपदी मूर्म यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.
पाटील यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती व शाल देऊन मूर्मू यांचा गौरव केला.
मुर्मू आणि पाटील यांनी एकमेकांच्या कामाविषयी कौतुकोद्गार काढले.
या भेटीवेळी राज्यपाल रमेश बैसदेखील उपस्थित होते.
दोन्ही महिला आजी-माजी राष्ट्रपतींची पुण्यात झालेली अविस्मरणीय ठरली.
या भेटीत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी मुर्मू यांंना भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छाही दिल्या.