सरकारनामा ब्यूरो
2025चा आज पहिला दिवस. बिहारमध्ये कडाक्याच्या थंडीत BPSC (Bihar Public Service Commission) चे विद्यार्थी सरकरने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आक्रमक आंदोलन करत आहेत.
गेल्या 14 दिवसापासून हे आंदोलन सुरु आहे. परंतु या आंदोलनावर पोलिसांनी लाठी चार्ज आणि पाण्याचा फावारा मारल्याने आंदोलनाला हिंसक वळण आले.
याचेचं परिणाम दिल्लीपर्यंत दिसून आल्याचं चित्र पाहायला मिळालं.
बीपीएससीची 70 वी पूर्वपरीक्षा रद्द करण्यात यावी, यांची मागणी विद्यार्थी आंदोलनात करत आहेत.
यासंदर्भात बीपीएससीच्या मुख्य सचिवांनी रविवारी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. मात्र, याचदरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज केला गेल्याने विद्यार्थी आक्रमक झाले.
आज पुन्हा हजारोच्या संख्येने विद्यार्थींनी गर्दनीबाग येथे एकत्र येत आंदोलन केले. यावेळी अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही सहभाग घेत आंदोलनाला समर्थन दर्शवले.
अद्यापही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे यांचा अंतिम निर्णय बीपीएससी आणि राज्यपालांवर सोडण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही विद्यार्थांना पाठिंबा दर्शवलत. बीपीएससीने नव्याने परीक्षा घेण्याचे आवाहन केले आहे.
जन सूराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर (पीके) यांनी केलेल्या लाठीचार्जविरोधात पोलिसांवर आवाज उठवला. यामुळे विद्यार्थी आधिकच आक्रमक झाले.
पोलिसांनी पीकेविरोधात एफआयआर नोंदवली, त्यामुळे संतप्त विद्यार्थींनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली.
यावर प्रशांत म्हणाले की, जर विद्यार्थी शांततेने आंदोलन करत होते. तर, त्यांच्यावर लाठीचार्ज का करण्यात आला. आता काही झाले तरी, बापू केंद्राच्या उमेदवारांसाठी 4 जानेवारीला पुन्हा परीक्षा होणारचं आहे. मग विद्यार्थीही आपल्या मागण्या सोडणार नाहीत.