Pradeep Pendhare
आजही भारतात सोने खरेदी करणे हे संपत्ती खरेदी करण्यापेक्षा अधिक शुभ मानले जाते. लग्नसमारंभात मुलीला सोने देण्याची एक परंपरा आहे.
भारतीय महिलांकडे अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशियाच्या महिलांकडील सोन्याच्या एकत्रित साठ्याच्या तुलनेत 11 टक्के अधिक सोने आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या माहितीनुसार, भारतीय महिलांकडे सुमारे 24 हजार टन सोने आहे. हे जगातील एकूण सोन्याच्या सुमारे 11 टक्के इतके आहे.
देशातील दक्षिण भारतात सोन्याच्या एकूण साठ्यापैकी 40 टक्के इतके सोने आहे.
एकट्या तामिळनाडू या राज्यात सोन्याचे प्रमाण 28 टक्के इतके आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या 2020-21 च्या अहवालानुसार भारतीय घरांमध्ये 21 ते 23 हजार टन इतके सोने होते.
2023 मध्ये घरांमध्ये 24 ते 25 हजार टनांपर्यंत पोचले आहे. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हा सोन्याचा ठेवा चालत आलाय.
2024 मध्ये सोन्याच्या किमती 28 टक्के वाढल्या असून 2025 मध्येही किमती वाढण्याचा अंदाज गोल्ड कौन्सिलने वर्तविला आहे.