Aslam Shanedivan
ब्रिटनच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होताना दिसत असून पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे.
लेबर पार्टीमध्येच स्टारमर यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवले असून ब्रिटनच्या पहिल्या मुस्लिम महिला पंतप्रधान म्हणून शबाना महमूद यांचे नाव आघाडीवर आले आहे.
शबाना महमूद या ब्रिटनच्या मंत्रिमंडळात सध्या गृहमंत्री असून त्या पंतप्रधान झाल्यास ब्रिटनच्या राजकारणात नवा इतिहास रचला जाईल
'एपस्टीन फाईल्स'ने वाढवले कीर स्टारमर यांचे टेन्शन वाढले असून त्यांनी नियुक्त केलेले राजदूत पीटर मंडेलसन यांचे नाव या फाईल्समध्ये आले आहे.
यामुळेच स्टारमर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर शबाना महमूद यांचे नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आले आहे.
४५ वर्षीय शबाना महमूद या पेशाने बॅरिस्टर असून त्या लेबर पार्टीच्या प्रभावशाली वक्त्या म्हणून ओळखल्या जातात.
त्यांचा जन्म १९८० मध्ये बर्मिंगहॅममध्ये झाला असून २००२ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शबाना यांचे कुटुंब मूळचे पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूरचे आहे.
२०१० मध्ये पहिल्यांदा त्या ब्रिटनच्या संसदेत पोहोचल्या. यावेळी पहिल्या तीन मुस्लिम महिला खासदारांमध्ये त्यांचा समावेश होतो.
शबाना महमूद यांची अत्यंत कडक असून गृहमंत्री म्हणून त्यांनी 'इमिग्रेशन' नियमात कठोर भूमिका स्पष्ट केली होती. यामुळे त्यांची 'लेडी आयर्न'ची ओळख तयार झाली आहे.