ब्रिटीश महिलेशी 2010 मध्ये ओळख, तीन वर्षांत लग्न..! खासदार अडकला भारतविरोधी षडयंत्रात?

Rajanand More

एलिझाबेथ कोलबर्न

एलिझाबेथ कोलबर्न-गोगोई या ब्रिटीश नागरिक असून त्यांच्यावर आता पाकिस्तानी एजंट असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

Elizabeth Gogoi, Gaurav Gogai | Sarkarnama

गोगोईंशी विवाह

एलिझाबेथ आणि आसाममधील काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांची २०१० मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर दोघांचा २०१३ मध्ये विवाह.

Elizabeth Gogoi, Gaurav Gogai | Sarkarnama

पाकिस्तानी एजंट

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गोगोई पती-पत्नीवर पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Himanta Biswa Sarma | Sarkarnama

पाकिस्तानी संस्थेत काम

पाकिस्तानी एजंट अली तौकीश शेखसोबत त्यांचे जवळचे संबंध असल्याचा दावा सरमा यांनी केला आहे. शेख यानेच एलिझाबेथ यांना पाकिस्तानी संस्थेत नोकरी लावली. तोच वेतनही देत होता, असे सरमांचा दावा.

Elizabeth Gogoi, Gaurav Gogai | Sarkarnama

गुपचूप दौरे

गोगोई पती-पत्नीचे पाकिस्तानात गुपचूप दौरेही झाले आहेत. लग्नाआधी गौरव गोगोई दहा दिवस पाकिस्तानात होते. तर एलिझाबेथ या अटारी सीमेवर पाकिस्तानात जायच्या, असा सरमांचा आरोप.

Elizabeth Gogoi, Gaurav Gogai | Sarkarnama

गोपनीय माहिती

एलिझाबेथ यांच्याकडून पाकिस्तानी एजंटला भारताशी संबंधित गोपनीय माहिती पुरविली जात असल्याचाही आरोप सरमा यांनी केला आहे.

Elizabeth Gogoi, Gaurav Gogai | Sarkarnama

भारतविरोधी कट

एलिझाबेथ आणि शेख यांनी भारतविरोधी कट रचल्याचा गंभीर आरोपही सरमा यांनी केला आहे. त्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली जाईल, असेही ते म्हणाले आहेत.

Elizabeth Gogoi | Sarkarnama

दोन मुले

गोगोई पती-पत्नीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही ब्रिटीश नागरिक आहेत. केवळ गौरव हे भारतीय नागरिक.

Elizabeth Gogoi, Gaurav Gogai | Sarkarnama

NEXT : अण्णामलाई यांनी निवडणुकीआधी दिला भाजपला धक्का; महत्वाच्या पदाचा राजीनामा, कारण आलं समोर...

येथे क्लिक करा.