पक्षनिष्ठा विकून खाण्याच्या जमान्यात बसपाचे एकमेव आमदार शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहिले; कोण आहेत उमाशंकर सिंह?

Amit Ujagare

कर्करोगानं निधन

मायावतींच्या बहुजन समाज पार्टीचे अर्थात बसपाचे एकमेव आमदार असलेल्या उमाशंकर सिंह ठाकूर यांचं दुर्मिळ अशा मेंदूच्या कर्करोगानं निधन झालं. गेल्या दोन वर्षांपासून ते या आजाराशी झुंज देत होते.

Umashankar Singh Thakur

आमदार

उमाशंकर सिंह हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रसडा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. सलग तीन वेळेला त्यांनी या मतदारसंघातून आमदारकी भुषवली आहे.

Umashankar Singh Thakur

एकनिष्ठ आमदार

उमाशंकर सिंह यांची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सध्याच्या पक्षनिष्ठा विकून खाण्याच्या जमान्यात ते बहुजन समाज पार्टीसोबत शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहिले. त्यामुळं त्यांची मृत्यूनंतरही सर्वाधिक चर्चा होत आहे.

Umashankar Singh Thakur

मायावतींचे भाऊ

बसपाच्या सर्वोसर्वा मायावती यांचे उमाशंकर सिंह हे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी होते. मायावतींना ते मोठी बहीण मानायचे त्यामुळं मायावती हे देखील त्यांना राखी बांधायच्या. त्यामुळं उमाशंकर सिंह यांच्या निधानानंतर मायावती यांना अश्रू अनावर झाले होते.

Umashankar Singh Thakur

मायावतींचा कुटुंबियांना पाठिंबा

उमाशंकर सिंह यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केल्यानंतर मायावती यांनी उमाशंकर यांच्या मुलाला विश्वास दिला की, कुठलीही अडचण आली तरी डगमगायचं नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

Umashankar Singh Thakur

रॉबिन हूड

उत्तर प्रदेशचा पूर्व भाग हा पूर्वांचल म्हणून ओळखला जातो या भागातील येणारे उमाशंकर सिंह हे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. बसपाचे तर रॉबिन हूड अशी त्यांची ओळख आहे.

Umashankar Singh Thakur

शेतकरी कुटुंब

उमाशंकर सिंह यांचे वडील घुरहू सिंग हे भारतीय सैन्यात होते, माजी सैनिक म्हणून ते निवृत्त झाले होते. वडील जरी सरकारी नोकरीत असले तरी कुटंब हे शेतकरी असल्यानं उमाशंकर सिंह सरकारी शाळेत शिकले.

Umashankar Singh Thakur

सरकारी शाळेत शिक्षण

त्यानंतर बलिया इथल्या सतीशचंद कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. तसंच कॉलेजमध्ये ते विद्यार्थी नेते होते, १९९१ मध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली होती, तसंच आजपर्यंतच्या सर्वाधिक मताधिक्यानं ते जिंकले होते.

Umashankar Singh Thakur

हिंदू-मुस्लिम विवाह

फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांनी हिंदू-मुस्लीम सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. यामध्ये त्यांनी जवळपास ३५० विवाह लावून दिले होते. हिंदू-मुस्लिमांमधील दरी करण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम घेतला होता.

Umashankar Singh Thakur

बिहारमधील 'अवैध' मंत्र्यासाठी आमदारकी सोडणारा भाजपचा वरिष्ठ नेता कोण?

Deepak Prakash
इथं क्लिक करा...