सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेशचे दिग्गज नेते कांशीराम यांनी 1984 मध्ये यूपीत बहुजन पक्षाची स्थापना केली होती.
पंजाबमधील रोपड जिल्ह्यातल्या खवासपूर गावी 1934 मध्ये एका दलित रविदासिया/शीख चांभार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरीसिंग व आईचे नाव बिशनकौर होते.
बीएससीचे शिक्षण घेतल्यानंतर भारतीय सर्वेक्षण खात्यात त्यांना राखीव स्थान देण्यात आले होते.
पुण्याच्या युद्धसामग्री कारखान्याच्या संरक्षण उत्पादन विभागात त्यांची वैज्ञानिक सहायक म्हणून बदली झाली. कालांतराने ते समाजात सक्रिय होत गेले.
सरकारी संस्थांमध्ये दलित कामगारांसाठी संघटना सुरू केली. त्यानंतर दलित शोषित संघर्ष समितीचीही त्यांनी स्थापना केली.
1991 मध्ये उत्तर प्रदेशातील इटावा येथून विजय मिळवला आणि लोकसभेत त्यांनी प्रवेश केला.
2001 मध्ये त्यांनी मायावती यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवली.
कांशीराम यांनी सत्ता स्थापन करण्याला नेहमीच महत्त्व दिले.
R