सरकारनामा ब्यूरो
आयएएस श्रेयांस कुमट हे मूळचे राजस्थानच्या अजमेर येथील एका छोट्याशा गावचे आहेत.
श्रेयांस हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने आयएएस अधिकारी व्हावेत, अशी त्यांच्या आजोबांची इच्छा होती. पण त्यांना इंजिनिअरिंगमध्ये रस होता.
अजमेरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर कोटा येथून त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
आयआयटी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी बी. टेक केले. जो त्यांचा आवडता विषय होता.
अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी एका व्यवस्थापन सल्लागार कंपनीत दोन वर्षे नोकरी केली.
कुटुंब आणि समाजाचाही फायदा होईल असे काहीतरी करावे हे लक्षात येताच, त्यांनी कॉर्पोरेट नोकरीतून राजीनामा देत यूपीएससीची तयारी करण्यास सुरुवात केली.
कोचिंग क्लासेसची संकल्पना न समजल्याने त्यांनी आपली रणनीती तयार केली. रोज आठ ते दहा तास सलग अभ्यास केला.
यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात चौथी रँक मिळवून ते आयएएस अधिकारी होऊन आजोबांचीही इच्छा पूर्ण केली.
R