सरकारनामा ब्यूरो
लोकसभा निवडणुकीपूर्वी बसपा नेते गुड्डू जमाली यांनी समाज पार्टीत प्रवेश केला आहे.
मायावतींच्या जवळचे मानले जाणाऱ्या या नेत्याच्या पक्षांतरामुळे बहुजन समाज पार्टीला मोठा धक्का बसला आहे.
आझमगडचे माजी आमदार शाह आलम ऊर्फ गुड्डू जमाली तेथील एक पक्के राजकारणी मानले जातात.
आझमगढच्या मुबारकपूर विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि विजयी होऊन ते आमदार झाले होते.
राजकारणातील सगळ्या प्रकारचे डावपेच ते सहजपणे हाताळतात, त्यामुळे कोणत्याही क्षणी राजकारणाला कलाटणी देण्याची त्यांच्यात क्षमता आहे.
राजकीय कारकिर्दीत त्यांनी आपली छाप सोडली, या नेत्याकडे प्रचंड संपत्ती आहे असे म्हटले जात आहे.
आझमगडच्या मुबारकपूरचे गुड्डू जमाली हे आझमगडचे मोठे व्यापारी आहेत.
उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक असून, त्यांच्याकडे महागड्या गाड्या आणि आलिशान घर आहे.
R