Mangesh Mahale
मायावती यांचे राजकीय गुरु कांशीराम यांनी 2001 त्यांना राजकारणात आणले. अन् आपला उत्तराधिकारी जाहीर केले.
मायावती यांनी आपला भाचा आकाश आनंद यांची पक्षातून हकालपट्टी केली असून आपला कुणीही उत्तराधिकारी नसणार असे त्यांनी जाहीर केले आहे.
लहानपणी दलित साहित्य वाचनाची आवड असलेल्या मायावतीना आयएएस (IAS)बनण्याची इच्छा होती.
1977 मध्ये त्या स्कूल टीचर बनल्या, अन् त्यांनी युपीएससीची तयारी सुरु केली.
दलित चळवळीत आक्रमक, वैचारीक नेत्या म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या.
1978 मध्ये कांशीराम यांनी ने BAMCEFची स्थापना केली. तेव्हा त्यांची भेट मायावती यांच्याशी झाली.
सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू नकोस, एक दिवस IAS अधिकारीच तुला सलाम करतील, असे कांशीराम यांनी मायावतींनी सांगितले होते
1984 मध्ये कांशीराम यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. मायावती या पक्षाच्या सचिव झाल्या.
2001 मध्ये कांशीराम यांनी मायावतींना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. 2003 मध्ये 47च्या वर्षी मायावती या पहिल्यांदा बीएसपीच्या अध्यक्षा बनल्या.
मायावती या उत्तर प्रदेशाच्या चार वेळा मुख्यमंत्री होत्या.