सरकारनामा ब्यूरो
असे काही IPS अधिकारी असतात जे त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी ओळखले जातात. यातीलचं एक नाव आहे सागरिका नाथ यांचे.
सागरिका नाथ या 2016 बॅचच्या IPS अधिकारी आहेत.
सागरिका या ओडिसा येथील ढेंकनाल शहरातील असून त्यांनी सीईटी भुवनेश्वर काॅलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक झाले आहे.
भुवनेश्वर येथे ट्रॅफिक एसपी आणि बालासोरचे एसपी म्हणून त्यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे.
बालासोर एसपी म्हणून सागरिका नाथ यांनी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. बहंगा रेल्वे अपघातादरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखली गेली. सायबर गुन्ह्यांच्या तपासातही सागरिकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
सध्या सागारिका या ओडिसातील खुर्दा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.