Nirmala Sitharaman : देशाचं 'बजेट' सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमण यांचे शिक्षण किती?

Rajanand More

पहिल्या अर्थमंत्री

देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर दुसऱ्या संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांता जगात नावलौकिक आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

सलग सात बजेट

निर्मला सीतारमण ता. 22 जुलैला सलग सातवे बजेट सादर करणार आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच अर्थमंत्र्यांना सातव्यांदा बजेट मांडण्याची संधी मिळाली आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

शिक्षण किती?

देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या सीतारमण उच्चशिक्षित आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तसेच एमफिलही पदवीही मिळवली आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

तमिळनाडूत शिक्षण

मुळच्या तमिळनाडूतील असून 18 ऑगस्ट 1959 रोजी मदुरैमध्ये जन्म झाला. पदवीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण तमिळनाडूत झाले.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

प्रेम विवाह

जेएनयूमध्ये एमफिलचे शिक्षण घेत असताना पराकला प्रभाकर यांच्याशी मैत्री झाली. मैत्री रुपांतर प्रेमात आणि नंतर दोघांनी विवाह केला.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

लंडनमध्ये वास्तव्य

विवाहनंतर दोघेही लंडनला शिफ्ट जाले. 1991 पहिल्या अपत्याचा जन्माआधी सीतारमण पतीसह स्वदेशी परतल्या आणि हैदराबादमध्ये स्थायिक झाल्या.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

भाजपमध्ये कधी?

पती भाजपचे प्रवक्ते असताना सीतारमण यांचाही राजकारणाकडे ओढा वाढला. त्या 2006 मध्ये भाजपमध्ये गेल्या. तर पुढच्याच वर्षी पतीने भाजपला सोडचिठ्ठी दिली.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

प्रवक्त्या ते अर्थमंत्री

पक्षात सुरूवातीला प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या सीतारमण या 2016 मध्ये पहिल्यांदा केंद्रात मंत्री बनल्या.  आधी संरक्षण आणि नंतर अर्थमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील राजकारणातील लाडके दादा..!

येथे क्लिक करा