Sunil Balasaheb Dhumal
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो.
आपल्या कार्यशैलीने अजित पवार लोकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.
राज्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यात तरुणांमध्ये दादांची क्रेझ आहे.
स्पष्ट बोलणारे, कामाचा तुकडा पाडणारे तसेच हळवा नेता म्हणून अजितदादांची ओळख आहे.
अनेक वेळा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पद सांभाळणाऱ्या अजित पवारांना आता मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहे.
मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजित पवारांनी कधीही लपवून ठेवलेली नाही.
केकवर 'मी अजित आशा-अनंतराव पवार, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...' असा मजकूर लिहला होता.
लोकसभेत अपयश आले तरी विधानसभेसाठी अजित पवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.