सरकारनामा ब्यूरो
1 फेब्रुवारीला 2025 ला अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे का? हा अर्थसंकल्प याच दिवशी का सादर केला जातो.
1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण आठव्यांदा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करतील.
अर्थसंकल्पात वर्षभरात होणारा खर्च आणि उत्पन्न यांचे नियोजन केले जाते यालाचं 'अर्थसंकल्प' असे म्हटले जाते.
स्वातंत्र्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येत होता.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 ला यात बदल करत ही परंपरा मोडली.
अर्थसंकल्प 2017 पासून फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 तारखेला सादर करण्यात येऊ लागला.
1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केल्याने सरकारला नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आपले काम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. त्याचबरोबर या अर्थसंकल्पामुळे संसदेचे पुढील कामकाज सुरळीत होते.
अर्थसंकल्पासाठी सभागृहात होणाऱ्या चर्चा, मतदानाची प्रक्रियाही यासाठी बराच कालावधी लागतो. तसेत या संकल्पात एप्रिल मार्च महिन्यात किती महसूल जमा होईल आणि वर्षाभरात किती खर्च केला जाणार यांचाही अंदाज यात मांडला जातो.