सरकारनामा ब्यूरो
विचार उच्च ठेवून सतत प्रयत्न केले तर त्याला यश मिळण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, याचंचं उत्तम उदाहरण आहेत पवन कुमार.
पवन कुमार हे मूळचे उत्तर प्रदेशातील बुलंदशहर या गावातील रहिवासी आहेत.
पवन कुमार यांनी 2022ला UPSC PCS ची परीक्षा उत्तीर्ण केली.
कुमार यांची नियुक्ती गोंडा येथे दिव्यांगजन सशक्तिकरण विभागात करण्यात आली.
राहायला साध घर नाही पण कुंटुंबाला चांगले घर देण्याचे स्वप्न लक्षात ठेवत त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केले.
त्यांच्या आईने तिचे दागिने मोडले तर बहिणीने तिचं शिक्षण सोडत मजुरी केली आणि पवन कुमार यांना शिक्षणासाठी मदत केली.
2017 ला त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय येथून इंटरची परीक्षा पास केली.यानंतर त्यांनी इलाहाबाद येथून बीएची डिग्री मिळवत UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
UPSC परीक्षेत दोनदा अपयश येऊनही त्यानी न हार मानता परीक्षेची तयारी सुरुचं ठेवली आणि तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.
2023 ला त्यांनी UPSC ची परीक्षा देत ऑल इंडिया 239 रँक मिळवली. यानंतर त्यांच पहिलं पोस्टिंग DSP म्हणून करण्यात आले.