ममतादीदींचा भाजपला जोरदार झटका; पराभवाचा बदला घेणार? ‘तो’ मोहरा गळाला...

Rajanand More

विधानसभा निवडणूक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २३ व २९ एप्रिल अशा दोन टप्प्यांत ही निवडणूक होणार आहे.

West Bengal Assembly | sarkarnama

तृणमूल विरूध्द भाजप

राज्यात तृणमूल काँग्रेस विरूध्द भाजप असा थेट सामना होणार आहे. यावेळी विजय मिळविण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

BJP | Sarkarnama

ममता बॅनर्जी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी नंदीग्रामऐवजी भवानीपूर मतदारसंघातून निवडणुकीला उतरल्या आहेत. भाजपने सुवेंदू अधिकारी यांना तिकीट देत आव्हान उभे केले आहे.

Mamata Banerjee | Sarkarnama

भाजपला झटका

उमेदवार जाहीर करण्यापूर्वी ममतांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. ‘नंदीग्रामचा मुलगा’ अशी ओळख असलेल्या नेत्यालाच त्यांनी भाजपमधून फोडले आहे. तसेच उमेदवारीही दिली आहे.

BJP | Sarkarnama

पवित्र कर

पवित्र कर यांना नंदीग्राम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून सुवेंदू अधिकारीही रिंगणात आहेत. ते दोन मतदारसंघात उमेदवार असतील.

Pabitra Kar | Sarkarnama

अधिकारी अडचणीत

पवित्र कर हे अधिकारी यांचे जुने सहकारी आहे. सुवेंदू यांनी तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांची घरवापसी झाली आहे. त्यामुळे सुवेंदू यांची अडचण वाढल्याची चर्चा आहे.

Pabitra Kar | Sarkarnama

पराभवाचा बदला

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत ममतादीदींचा सुवेंदू यांनी नंदीग्राम मतदारसंघात पराभव केला होता. आता सुवेंदू यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी पवित्र कर यांना मैदानात उतरविले आहे. 

Mamata Banerjee | Sarkarnama

प्रसिध्दीपासून दूर

पवित्र कर हे प्रसिध्दीपासून दूर असले तरी नंदीग्राममध्ये तळागळातील लोकांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. अनेक सामाजिक कामांमध्ये ते सक्रीय असतात. त्यामुळेच त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याचा फायदा आता निवडणुकीत होणार का, याची उत्सुकता.

Pabitra Kar | Sarkarnama

NEXT : महापालिकेत भाजपला विजय मिळवून देणाऱ्या महिला नेत्याला थेट आमदारकीची लॉटरी

येथे क्लिक करा.