Bihar Election : बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी 'या' चेहऱ्याला सर्वाधिक पसंती, सर्व्हेने वाढवले टेन्शन!

Roshan More

निवडणूक

बिहार विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

राजकीय पक्षांकडून प्रचार

या निवडणुकीसाठी आत्तापासून राजकीय पक्षांकडून प्रचार सुरुवात करण्यात आली आहे.

तिरंगी लढत

भाजप-नितीश कुमार यांची महायुती तर, काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांची महाआघाडी तसेच प्रशांत किशोर यांचा जनसुराज अशी तिरंगी लढत निवडणुकीत होणार आहे.

मुख्यमंत्री कोण?

बिहारच्या निवडणुकीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा म्हणून सर्वाधिक पसंती कोणाला यावर सी वेटरने सर्व्हे केला आहे.

नितीश कुमार

बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून 16 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. ते तिसऱ्या स्थानावर आहेत.

प्रशांत किशोर

पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले प्रशांत किशोर यांना तब्बल 23 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ते दुसऱ्या स्थानावर आहेत.

तेजस्वी यादव

मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा म्हणून सर्वाधिक पसंती मिळालेल्यांमध्ये तेजस्वी यादव प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांना तब्बल 35 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे.

NEXT : पंतप्रधान मोदींनी जारी केलेलं टपाल तिकीट अन् नाणं का आहे खास?

येथे क्लिक करा