Rajanand More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी (ता. १ ऑक्टोबर) दिल्लीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे होते.
आरएसएसच्या शताब्दीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करण्यात आले. या दोन्ही गोष्टी खास आहेत.
टपाल तिकीटावर 1963 मध्ये आरएसएसच्या स्वयंसेवकांनी दिल्लीत राजपथावर केलेले पथसंचलन आणि सेवा कार्याचे छायाचित्र आहे.
पतसंचलनासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आरएसएसला निमंत्रित केले होते. या पथसंचलनाची आठवण व एक ऐतिहासिक क्षण म्हणून हे टपाल तिकीट जारी केले.
विशेष नाण्याच्या एका बाजूला भारतमाता आणि पारंपरिक पध्दतीने नमन करणारे स्वयंसेवक यांची मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला अशोकस्तंभ आणि मुल्य आहे.
नाण्याचे मूल्य शंभर रुपये एवढे असून ते चांदीचे आहे. त्यावर संघाचे बोधवाक्यही कोरण्यात आले आहे.
विशेष टपाल तिकीट आणि नाणे जारी करताना पंतप्रधान मोदींनी संघाच्या कार्याचा गौरव केला. अनेक अडचणींना पार करत संघ वटवृक्षाप्रमाणे उभा असल्याचे ते म्हणाले.
संघाचे स्वयंसेवक समाजापासून वेगळे नाहीत. ते समाजाचाच एक भाग आहेत. त्यांनी नेहमीच लोकशाही घटनात्मक संस्थांवरील विश्वास कायम वृध्दिंगत केल्याचे मोदी म्हणाले.